महाराष्ट्र
पुणे : Uddhav Thackeray विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात उच व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आव्हान मोडून काढले. आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. एका माजी मंत्र्यांसह ठाकरेंचे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांचे पुण्यात लक्ष नाही. त्यामुळे माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. त्यातील पाच जणांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व जण मुंबईत पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये बाळा ओसवाल, विशाल धनवडे यांच्यासह आणखी चार नगरसेवकांचा समावेश आहे. त्यात एक माजी मंत्री आणि त्यांचे सुपुत्र यांचीही चर्चा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षातर्फे पुणे शहरातील तीन आणि जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये दावा करण्यात आला होता. परंतु महाविकास आघाडी बरोबरची गणिते जुळताना शिवसेनेला नरमाईची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे संघटनेमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेला निवडणूक लढण्याची संधी मिळालेली असतानाही दारुण पराभव झाला. त्यातच कायम निर्णायक भूमिका घेणारा घटक भाजपवासी होत असल्याने पाच जानेवारी रोजी यामध्ये आणखी किती भर पडणार असल्याचीही चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील गडाला सुरंग लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेपुणे विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे वाढते लक्षात घेता आगामी भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ते सर्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे.
पुणे शहरातील मुख्य निर्णयाची पदे उपभोगणाऱ्या आणि पुणे महापालिकेमध्ये सक्रिय असलेला गटच सुरक्षित भविष्यासाठी पक्षांतर करत असल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट