विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jitendra Awhad राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पीक कर्जे फेडण्याचे आवाहन करताना पुढील दाेन वर्षे तरी कर्जमाफी हाेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही यावरून दादा, क्या हुआ तेरा वादा असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.Jitendra Awhad
दादा क्या हुआ तेरा वादा? असा सवाल करत आव्हाड यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था करून ठेवलीत…पाण्याविना पिकं करपून गेलीत, काही भागांत दुष्काळाची परिस्थिती आहे… लोकांना वीज बिल , शैक्षणिक खर्च , इतर वैयक्तिक कर्ज यामध्ये गुरफटून ठेवलं आह कुठून भरतील कर्जे आणि कुठून आणणार पैसा… ते सत्तेत थोडीच आहेत…तुम्हीच आश्वासने दिली होती…शेतकर्यांची कर्जे माफ करणार म्हणून… शेवटी जनता म्हणतेय, दादा क्या हुआ तेरा वादा… वो कसमे वो इरादा.
कर्जमाफीच्या निर्णयावरून सरकारने जनतेला फसविल्याचा आराेप विराेधी पक्षाच्या इतर नेत्यांनीही केला आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवार्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच ३१ मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. २१०० चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर १५०० रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन १० लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि २१०० रुपये मिळण्यासाठी ५ वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत.
Dada, what happened to your promise, what was your intention, Jitendra Awhad’s target on Ajitdada
महत्वाच्या बातम्या
-
Sudhakar Pathare : आयपीएस सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन
-
Eknath Shinde तुम्ही अत्यंत चिल्लर लोक, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
-
Congress : सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, खोळंबल्या, काँग्रेसचा आरोप
-
उदयनराजे सरकारवर भडकले, छत्रपतींबाबत कायदा करायला बजेट लागते काय?