खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा

खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे, असा इशारा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. . Dhananjay Munde

आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढे आहारी गेले होते की, त्यामुळे त्यांचं कुटुंब देखील त्यांच्यावर नाराज असेल, त्यांची आई तर गेल्या दीड वर्षांपासून मुळ गावी नाथ्रा येथे गेल्या आहेत, त्या अजून आल्या नाहीत असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. धस यांच्या या विधानानंतर आता धनंजय मुंडे आक्रमक होत एक्स या सोशल मीडिया हॅण्डलवर ट्विट करत सुरेश धस यांना इशारा दिला आहे. Dhananjay Munde

राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळं मी सहन केलं. मात्र राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत आहे, असेही ते म्हणाले.

मुंडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत, तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच या आधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले.

माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केल्या गेले. मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे.

Dare to make false allegations… Dhananjay Munde’s warning to Suresh Dhas

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023