विशेष प्रतिनिधी
Mumbai News: रेल्वेच्या वतीने महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात मुंबईसह इतर परिसरात १७ हजार कोटींची कामे सुरू आहेत. महाराष्ट्रात लवकरच नवीन सर्किट ट्रेन सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
बईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंट या ठिकाणी ‘वेव्ह्स समिट 2025’ पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव विविध ऑडिटोरिअम्सची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत घोषणा केल्या.मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास २४ हजार कोटी राज्याला मिळाले आहेत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरु करणार आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने १० दिवस प्रवास करता येणार आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“विदर्भाचा छत्तीसगड-तेलंगणासोबतचा व्यवहार वाढणार आहे. गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईन चा दुहेरीकरण याकरता 4819 कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत. आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे. विशेषत: छत्तीसगड आणि तेलंगणाचा जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाचे नाही, कारण आपल्याला माहिती आहे की गोंदिया अशा ठिकाणी आहे की जिथे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासनं तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो. त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजीक अशा प्रकारची ही जी लाईन आहे”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
विशेषत: 132 स्टेशन्स महाराष्ट्रातील केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्री डेव्हलपमेंट करता घेतलेली आहे. त्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्त्वाचे स्टेशन. १ लाख ७३ हजार कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आपण जर बघितलं तर यूपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाही, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis announces that new circuit train will be built soon in Maharashtra, works worth Rs 1 lakh 73 thousand crores are underway
महत्वाच्या बातम्या