विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis काॅंग्रेसबराेबर जाऊन उध्दव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. यामुळेच शिवसेनेत उठाव हाेऊन उभी फूट पडली. आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटासाठी कसाेटीची वेळ आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन बाळासाहेबांचे विचार जपणार का असा प्रश्न विचारला जात आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना थेट सवाल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राखणार की तृष्टीकरण करत राहणार असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.Devendra Fadnavis
मोदी सरकारकडून बुधवारी वक्फ सुधारण विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालानंतर सुधारणा करण्यात आलेल्या विधेयकावर लोकसभेत बुधवारी चर्चा होईल. मग, विधेयकाच्या मंजुरी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. कें हे विधेयक मंजूर होताना शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) खासदारांची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेने सॉफ्ट हिंदुत्त्वाचा मुद्दा हातात घेतला आहे. असे असताना दुसरीकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंनी हिंदुत्त्व सोडल्याचा सातत्याने आरोप केला जातो. पण, आपण हिंदुत्त्व सोडले नाही, हे उद्धव ठाकरे सातत्याने सांगतात. आता वक्फ सुधारण विधेयकावर लोकसभेतील ठाकरेंचे नऊ खासदार काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. एक्स या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर एक पाेस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?,” असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
Devendra Fadnavis questions Uddhav Thackeray whether he will maintain Balasaheb’s views or continue to satisfy them.
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशा