Dhananjay Munde : धनंजय मुंडे आणि गँगची वृत्ती औरंगजेबापेक्षा क्रूर, करुणा मुंडे यांचा आराेप

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आणि गँगची वृत्ती औरंगजेबापेक्षा क्रूर, करुणा मुंडे यांचा आराेप

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

Mumbai News: औरंगजेबाने स्वत:च्या बायकोला तुरूंगात टाकले नव्हते; किंवा दोन कवडीच्या गुंडांकडून मारहाण केली नव्हती. औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्याच्या गँगची आहे. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद गेले, आता आमदारकी सुद्धा जाणार आहे. मुंडेसारखे लोक मंत्री आमदार सोडा समाजात राहण्याच्या लायकीचे नाहीत, अशी टीका करूणा मुंडे-शर्मा यांनी केली.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना करूणा मुंडे-शर्मा म्हणाल्या, “ “औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती धनंजय मुंडे आणि त्याच्या गँगची आहे. माझ्या बहिणीवर अत्याचार झाला आहे. माझ्यावर प्रेशर टाकत आहेत, तसे माझ्या आईवर प्रेशर टाकल्याने तिने आत्महत्या केली. औरंगजेबाने स्वत:च्या बायकोला तुरूंगात टाकले नव्हते. बायकोला दोन कवडीच्या गुंडांकडून मारहाण केली नव्हती. मंत्रीपद गेले आहे, आता आमदारकी सुद्धा जाणार आहे. असे लोक मंत्री, आमदार सोडा समाजात राहण्याच्या लायकीचे नाहीत.

धंनजय मुंडे यांच्या 2012 सालापासून एकत्र रिलेशनशिपमध्ये असून लग्न झाले नसल्याच्या दाव्यावर करुणा मुंडे म्हणाल्या, माझे आणि धनंजय मुंडे यांचे लग्नच होते. असा कोणताही व्यक्ती 27 वर्षे सोबत राहू शकत नाही. धनंजय मुंडेंनी न्यायालयात सांगितले की, ‘मी त्यांची बायकोच नाही. मी आमदार झाल्यानंतर मुंबईत येत जात होतो.’ धनंजय मुंडे खोटारडे व्यक्ती आहेत. धनंजय मुंडे 2010 मध्ये आमदार झाले आहे. आमचे नाते 1996 पासून आहे. 1998 साली लग्न झाले. न्यायाधीशांनी म्हटले की, ‘इतके दिवस तुमचे नाव वापरत होते, तर का शांत होते?’ असा सवाल मुंडेंच्या वकिलांना केला आहे.

“माझ्या नवऱ्याला माझी लढण्याची वृत्ती माहिती होती. पण, मुंडेंच्या दलाल गँगला वाटत होते की, मी 25 ते 50 करोड घेऊन शांत बसेल. मी नाचणारी महिला नाही. मी दोन मुलांना जन्म दिला आहे. मी 27 वर्षे माझ्या नवऱ्याला साथ दिली आहे. मंत्री झाल्यावर त्यांच्या पैशांवर नाचणारी आणि गाणारी महिला ऐश करत आहे. सगळे पुरावे कोर्टात देणार आहे. मी काय-काय त्याग केलाय, हे कोर्टात देणे अजून बाकी आहे,” असा इशारा करूणा मुंडे-शर्मांनी दिला.

Dhananjay Munde and gang’s attitude is more cruel than Aurangzeb, alleges Karuna Munde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023