विशेष प्रतिनिधी
बीड : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सुरु असलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय संतप्त झाले आहे. धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी प्रथमच माध्यमांसमोर येऊन आपला संताप व्यक्त केला. सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत माहिती आहे असा आरोप करून किती दिवस गप्प बसायचे असा सवालही त्यांनी केला.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊसुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचा दावा केला आहे . त्यांच्या या दाव्यानंतर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या कुटुंबात कलह सुरू असून चुलत भाऊ नाराज आहेत, असा आरोप केला जातोय. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे. आमच्या बाई म्हणजे धनंजय मुंडे यांच्या आई परळीला राहत होत्या. परळीतील निवासस्थानचं काम धनंजय मुंडे यांनी हाती घेतलंय. गावाकडे घर असल्याने बाईंनी गावाकडे राहायची इच्छा व्यक्त केली. धनंजय मुंडेही परळीला आले तरी ते आईकडे राहतात. पण सध्या सनसनाटी आरोप करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपण कुठवर गप्प बसणार?”
हजार कार्यकर्ते गप्प आहेत. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा आहे, या हेतुने आम्ही शांत आहोत. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की संपूर्ण कुटुंब एक आहे. धनंजय मुंडे यांनी २०-२५ वर्षे खस्ता खालल्या आहेत. आज दोघे बहिण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांना खुपतंय. त्यांना बदनाम केलं जातंय. त्यांची प्रकृती वाईट असून ते अनेक आजारांना सामोरे जात आहेत, पण आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर कोणीही नाराज नाही”, असेही अजय मुंडे म्हणले.
अजय मुंडे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सुरेश धस यांची मुलाखत पहिली. त्यात धनंजय मुंडे यांच्या आई बद्दल बोलत आहेत कौटुंबिक कलह असल्याचा आरोप केला. धस यांच्या आरोपाला अर्थ नाही.गावाला जाऊन राहणं गुन्हा आहे का?
सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे हे माहीत आहे, असा टोला मारत अजय मुंडे यांनी सुरेश धसांना खोक्या प्रकरणात सह आरोपी केले पाहिजे अशी मागणी केले. धस यांचा जावई शोधा, असेही ते म्हणाले. सुरेश धस यांनी पुरावे दिले पाहिजे
Dhananjay Munde’s brother angry on Suresh Dhas over allegations of domestic violence
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श