Dhananjay Munde : आमदार झाल्यावर मुंबईला जाणं-येणं वाढल्याने करुणा शर्मा यांच्यासाेबत रिलेशनशिप, धनंजय मुंडे यांची कबुली

Dhananjay Munde : आमदार झाल्यावर मुंबईला जाणं-येणं वाढल्याने करुणा शर्मा यांच्यासाेबत रिलेशनशिप, धनंजय मुंडे यांची कबुली

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Dhananjay Munde आमदार झाल्यावर मुंबईला जाणं-येणं वाढलं. याच काळात करुणा शर्मा यांच्या संपर्कात आलो. अगोदरच राजश्री मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचं करुणा शर्मा यांना माहिती होतं. पण तरीही त्यांनी माझ्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहण्याची तयारी दर्शवली. यानंतर मला त्यांच्यापासून दोन मुलं झाली. पण करुणा शर्मा यांनी माझ्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. मी आमच्या दोन्ही मुलांना माझं नाव दिलेलं आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी न्यायालयात दिली.Dhananjay Munde

करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे हे दोषी आढळले असून वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा शर्मा यांना 1,25,000 आणि त्यांच्या मुलीला 75,000 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र माझगाव सत्र न्यायालयाने 5 एप्रिल रोजी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश कायम ठेवले होते. याप्रकरणी आज (9 एप्रिल) माझगाव सत्र न्यायालयाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. ज्यात धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबतच्या नात्याबाबत माहिती दिली आहे.

माझगाव सत्र न्यायालयाने 5 एप्रिल रोजी करुणा शर्मा यांच्या बाजून निकाल दिला होता. तसेच करुणा शर्मा यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्यासंदर्भातला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे आदेशही कायम ठेवला होता. या निकालाचा सविस्तर आदेश आता समोर आला आहे. या आदेशानुसार, धनंजय मुंडे यांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटले होते की, 21 मार्च 2001 मध्ये राजश्री मुंडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता.

करुणा शर्मा यांना पोटगी मिळू नये, म्हणून धनंजय मुंडे यांच्या वकिलाने दोघांचे अधिकृत लग्न न झाल्याचा दावा केला होता. तर करुण शर्मा यांच्या वकिलाने लग्नाचे पुरावे असल्याचे म्हटले. याप्रकरणी 5 एप्रिल रोजी सुनावणी झाली, तेव्हा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची मीच पहिली पत्नी असल्याचा पुरावा म्हणून दोन महत्त्वाची कागदपत्रे दिली. त्यात धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र होते. स्वीकृती पत्रात माझ्या घरच्यांच्या दबावापोटी मी लग्न करत आहे. पण करुणा मुंडे यांचा मी सांभाळ करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. हे सर्व पुरावे तपासल्यानंतर माझगाव सत्र न्यायालयाने वांद्रे दंडाधिकारी न्यायालया निर्णय कायम ठेवला होता.

Dhananjay Munde’s confession of relationship with Karuna Sharma due to increased commuting to Mumbai after becoming an MLA

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023