विशेष प्रतिनिधी
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चेंबरमध्ये बंद दाराआड २० मिनिटे चर्चा झाली. यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र जयंत पाटील यांच्यासोबत एआयवर चर्चा झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार म्हणाले, प्रसारमाध्यमांनी काय आणि कोणत्या बातम्या लावाव्यात, हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहून बातम्या द्यायला हव्यात. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो. आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतोय. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे.
एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे. आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत, याबाबत आमच्यामध्ये चर्चा झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी अजित पवार आणि जयंत पाटील मांजरी येथे आले होते. सकाळी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चेंबरमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. बंद दाराआड दोघांमध्ये बैठक झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली.
Discussion on AI with Jayant Patil, Ajit Pawar clarified
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार