विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chitra Wagh पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर शिवसेना ठाकरे गराचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर भारतीय जनता पक्षाच्या आमदार चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगण्यापेक्षा स्वतःच्या गटाला पडलेले खिंडार सांभाळा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.Chitra Wagh
चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की , सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट झाला आहे. आता या उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे. पण या स्वयंघोषित विश्वगुरूने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावे. भारतीय जनता पार्टी आणि प्रधानमंत्री मोदीजी वगैरेंवर बोलण्याची एकतर त्यांची कुवत नाही आणि तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरजही नाही.
भारतीय जनता पार्टीचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वतःच्या गटाला पडलेले खिंडार सांभाळा. जरा गटप्रमुख असलेल्या उबाठांना तर आपण विधानपरिषद आमदार आहोत याचादेखील विसर पडलाय. त्यांना त्यांच्या कामाची आठवण करून द्या. नाहीतर काही वर्षांत तुमच्या पक्षाचे अस्तीत्व देखील उरणार नाही,” अशी टीकाही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केली
संजय राऊत म्हणाले आहेत की , ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकीय पदांवरून बाजूला होण्याचा नियम स्वतः मोदींनीच केला आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात ते ७५ वर्षांचे होतील आणि त्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात संघातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. यावर राऊत म्हणाले की , मोदींच्या राजकीय वारसदाराबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. त्यांचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातील असेल.
Dont predict about Bjp, Take care of the obstacles that have fallen on your own group, Chitra Wagh told Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
-
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा