Rohini Khadse : लाेकांच्या करातून पैसे, उपकाराची भाषा करू नका, राेहिणी खडसे यांनी नरेश म्हस्केंना सुनावले

Rohini Khadse : लाेकांच्या करातून पैसे, उपकाराची भाषा करू नका, राेहिणी खडसे यांनी नरेश म्हस्केंना सुनावले

Rohini Khadse

विशेष प्रतिनिधी

Mumbai News : रेल्वेने गेलेल्या लाेकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानाने परत आणले, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राेहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी त्यांना सुनावले आहे. लाेकांच्या टॅक्समधील पैशातून मदत केली. उपकाराची भाषा करू नका असे खडसे म्हणाल्या.

पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांची हत्या करण्यात आली. यात ६ महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश होता. तसेच, या घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याकरता महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: श्रीनगरला गेले आणि त्यांनी एका अतिरिक्त विमानातून महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना सुखरूप परत आणले. याबाबत माहिती देताना, शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले होते की, काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या लोकांपैकी काही लोक तिथे रेल्वेने गेले होते. सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले, काम करण्याची स्फूर्ती वाढली. एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता.

यावर राेहिणी खडसे म्हणाल्या, दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयात महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू आहे. सध्याची वेळ ही सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे. पण खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत. त्यामुळे अशा वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडेल हे विसरू नका. ज्या विमानातून तुम्ही लोकांना आणलेत, ती विमानसेवा लोकांच्या टॅक्समधून दिली जात आहे. त्याचे पैसे तुम्ही तुमच्या घरून भरलेले नाहीत. त्यामुळे उपकाराची भाषा करू नका.

Don’t talk about money and favors from people’s taxes, Rohini Khadse told Naresh Mhaske

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023