Chief Minister : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे नावेदसाठी यंदाची ईद घेऊन आली नवी आशा

Chief Minister : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे नावेदसाठी यंदाची ईद घेऊन आली नवी आशा

Chief Minister

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chief Minister मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे अमरावतीतील २३ वर्षीय तरुण नावेद अब्दुल नईम या तरुणासाठी यंदाची ईद एक नवीन आशा घेऊन आली आहे. ब्लड कॅन्सरशी (लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया ) लढत असलेल्या नावेदला मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेने मदत मिळाली. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात पुढे न केला असता, तर कदाचित मी आज हसत बोलत आपल्यासमोर उभा राहू शकलो नसतो. त्यांनी आम्हाला खरी ईदी दिली असे भावनिक उद्गार नावेदने काढले.Chief Minister

कॅन्सरमुळे नावेदचे तब्बल १२ किलो वजन घटले होते. तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव, चक्कर येणे असे गंभीर परिणाम त्याच्या शरीरावर दिसून येत होते. २०२३ मध्ये पहिल्यांदा निदान झालेल्या या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने नावेदच्या कुटुंबावर मोठे संकट आले. त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, ते अमरावतीतील एका कापड दुकानात काम करतात. तीन मुलींचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना नावेदच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ३० ते ३५ लाख रुपये उभे करणे त्यांना अशक्यप्राय होते. उपचारासाठी लागणार्‍या खर्चाची रक्कम ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर नावेदच्या वडिलांनी अमरावतीचे आमदार संजय खोडके व सुलभा खोडके यांच्याकडे धाव घेतली. आमदारांनी परिस्थिती समजून घेत, त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नावेदला तातडीने मदत मिळाली. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये, टाटा ट्रस्टकडून १५ लाख रुपये, तर उर्वरित रक्कम धर्मादाय रुग्णालयाच्या मदतीतून कोकिलाबेन हॉस्पिटल आणि काही प्रमाणात सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळाली. या मदतीमुळे नावेदच्या उपचारांचा मार्ग सुकर झाला. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नावेदवर अत्याधुनिक उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सध्या नावेदवर मिनी हायपर सीव्हीएडी किमोथेरपी आणि इतर औषधोपचार सुरू आहेत. त्याच्या २१ वर्षीय बहिणीची एचएलए जुळणी झाल्याने ती दाता म्हणून पात्र ठरली आहे. ४ एप्रिल रोजी तिच्या स्टेम सेल्स नावेदच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत. डॉक्टरांच्या मते, या बोने मार्रोव ट्रान्सप्लांटमुळे नावेदच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल.

Due to the sensitivity of the Chief Minister, this year’s Eid brought new hope for Naveed

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023