विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra राज्यात आता ई-बाईक आणि ई-टॅक्सी सेवा अधिकृतपणे सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. परिवहन विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.Maharashtra
ही सेवा विशेषतः एकट्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. खाजगी वाहनांसाठी दुप्पट-तिप्पट भाडं द्यावं लागत होतं, तिथे आता प्रवाशांना कमी दरात बाईक टॅक्सीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला ही सेवा १५ किलोमीटरच्या मर्यादेत राहणार असून, केवळ ५० बाईक एकत्र घेणाऱ्या संस्थेलाच परवानगी दिली जाणार आहे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष नियमावली तयार करण्यात आली असून, पावसाळ्याच्या दिवसात प्रवास अधिक सुरक्षित व्हावा म्हणून कव्हर असलेल्या बाईक व ई-टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या असून, केवळ इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
या निर्णयामुळे महाराष्ट्रात प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सरकारचा प्रयत्न म्हणजे प्रवाशांना कमीत कमी पैशात सोयीसुविधा उपलब्ध करून देणं. विशेष म्हणजे, जर रिक्षाचालकांच्या मुलांनी ई-बाईक घेतली, तर त्यांना दहा हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे मुंबईत दहा हजार आणि संपूर्ण महाराष्ट्रात वीस हजारांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. “ई-बाईक टॅक्सी ही महाराष्ट्रातील प्रवासासाठी नवा पर्याय ठरणार असून, हा निर्णय पर्यावरण पूरक आणि रोजगार निर्मितीस चालना देणारा ठरणार आहे,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
E-bike taxis approved in Maharashtra, a big decision towards pollution-free life
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा