विशेष प्रतिनिधी
नागपूर : आमचे सगळे जीवभावाचे कार्यकर्ते आहेत, माणूस आहे. प्रत्येकाची अपेक्षा असते काही वेळा भावना व्यक्त होतात. पण मंत्री पदापेक्षा आमचं नातं जिव्हाळ्याचे आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. Eknath Shinde said, “Our relationship is more intimate than ministership.”
राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने आमदार प्रकाश सुर्वे, विजय शिवतारे नाराज झाले. आहेत. या नाराज आमदारांची आज शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेनेचे आमदार, कार्यकर्ते काल माझ्या सोबत होते, आजही माझ्या सोबत आहेत आणि उद्या ही राहतील. शिवसेना हा एक परिवार आहे. परिवारात भांडण होतात. काही लोक राजकीय अर्थ काढू लागले आहेत. पण मंत्रीपदा पेक्षा आमच जिव्हाळ्याच नातं आहे ते महत्वाचे आहे.
मलाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद महत्वाचं आहे. पदे येतात जातात, ज्या आमदारांची क्षमता आहे त्यांना मंत्री बनवले. बाकीचे पण आहे, त्यांनी वाईट मानून घ्यायची गरज नाही. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना पुढच्या टप्प्यात संधी मिळेल आता ते पक्षातील कामे करतील. एक दोन दिवस माणसाच्या मनात नाराजी असते , कुटुंबापासून कोणी दूर होत नाही. लोकांच बहुमत मिळाल्याने आता आमची जवाबदारी आहे. मलाकाय मिळालं त्या पेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं हे महत्त्वाच आहे अडीच वर्षात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला.
कल्याण घटनेबाबत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केलेलं आहे. त्यावर कारवाई देखील केलेली आहे. मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. या महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान कोणालाही करता येणार नाही संबंधित घटना गांभीर्याने घेतलेली आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.
Eknath Shinde said, “Our relationship is more intimate than ministership.”
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिलेल्या धक्क्यामुळे खाली पडून भाजप खासदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत
- Sharad Pawar ऊसाला जास्त भाव मिळावा यासाठी शरद पवारांनी पत्र लिहायला हवे होते, सदाभाऊ खोत यांचा सल्ला
- salman khan खो-खो विश्वचषकाचा पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार
- JPC formed वन नेशन-वन इलेक्शन विधेयकासाठी जेपीसी स्थापन