विशेष प्रतिनिधी
सातारा : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचे कुणाशी जरी लागेबांधे असले तरी त्यांना सोडले जाणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठामपणे सांगितले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटला तरीही त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वाल्मिक कराड विरोधात मकोका लावण्यात आलेला नाही. कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. यामुळे देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगच्या गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं.
याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या झाली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली असून सीआयडीही चौकशी करत आहे.
आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही. आरोपीचे कुणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. आरोपींनी ज्या निर्घृण पद्धतीने हत्या केली, तशाच प्रकारे त्यांनाही फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडेल”, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
Eknath Shinde testified that goverment will not release the accused even if he has a relationship with anyone
महत्वाच्या बातम्या
- Congress : नाना पटोले यांची होणार गच्छंती, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत
- दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर..सुप्रिया सुळे यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार
- नास्तिक मेळाव्यात अभिनेते वैभव मांगले म्हणाले देवाचा पुजारी सर्वात नास्तिक..
- Senior SIT officials एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार; पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांची माहिती