विशेष प्रतिनिधी
मुंबई ; Anna Bansode पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.निवडीला दोन दिवस पूर्ण होत नाही तोच आता मुंबई उच्च न्यायालयाकडून बनसोडेंना हजर होण्याचे आदेश आले आहेत.Anna Bansode
बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बनसोडे यांना बुधवारी, 2 एप्रिलला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याचिकेवर न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर बनसोडे यांना बुधवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता बनसोडे यांच्या आमदारकीवर टांगती तलावर येऊ शकते.आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी दोन दिवसांपुर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अण्णा बनसोडे हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार पदी निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे.
Election as Deputy Speaker of the Assembly and High Court orders Anna Bansode to appear within two days
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची