विशेष प्रतिनिधी
मुंबई : State Electricity राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्टसह इतर वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगाने शुक्रवारी (28 मार्च) मध्यरात्री मंजुरी दिली आहे. एक एप्रिलपासून नवीन वीज बिल लागू होणार असून यामुळे राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या या निर्णयानंतर पुढील पाच वर्षात अपारंपारिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत. कृषीग्राहकांना पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने दिसाला मिळणार आहे.State Electricity
राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील कृषी वगळता सर्व वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर (टीओडी) टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहे. या माध्यमातून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी प्राधान्य राहणार आहे. हे मीटर बसविणाऱ्या ग्राहकांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या सौर ऊर्जानिर्मितीच्या काळातील वीजवापरासाठी प्रतियुनिट 80 पैसे ते एक रुपया सवलत मिळणार आहे. स्मार्ट मीटर बसविणाऱ्या औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीजवापरास 10 ते 30 टक्के वीज दरात सवलत मिळणार आहे. मात्र सायंकाळी पाच ते रात्री 10 व 12 वाजेपर्यंतच्या वीज वापरासाठी ग्राहकांना 20 टक्के जास्त मोजावे लागणार आहेत. महावितरण व अदानी कंपनीचे नलीन वीज दर एक एप्रिलपासून सरासरी 10 टक्के, टाटा कंपनीचे 18 टक्के, तर बेस्टचे वीजदर 9.82 टक्के कमी होणार आहे.
पुढील पाच वर्षात अपारंपारिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीज दर कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र कृषी ग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचेही वीज दर कमी होईल, मात्र त्यांना दिलासा मिळण्यास वेळ लागेल. निवासी हॉटेल्स, गेस्ट हाऊस आदींना वाणिज्यिक ऐवजी औद्योगिक ग्राहकांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचेही वीज बिलात मोठ्या प्रमाणावर घट होऊन, त्यांना देखील दिलासा मिळणार आहे.
Electricity consumers will get relief, State Electricity Regulatory Commission approves implementation of new electricity rates for electricity companies
महत्वाच्या बातम्या
-
Sudhakar Pathare : आयपीएस सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन
-
Eknath Shinde तुम्ही अत्यंत चिल्लर लोक, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
-
Congress : सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, खोळंबल्या, काँग्रेसचा आरोप
-
उदयनराजे सरकारवर भडकले, छत्रपतींबाबत कायदा करायला बजेट लागते काय?