विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी कुख्यात डी कंपनीच्या नावाने दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सिद्दिकी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला आहे. Zeeshan Siddiqui
सिद्दीकी यांना एका ईमेलद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. याची माहिती सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांचं पथक झिशान यांच्या घरी पोहोचलं आहे. या धमकीमुळे सिद्दीकी कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची ६ महिन्यांपूर्वीच हत्या झाली आहे. त्या प्रकरणाच्या आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोई टोळीचं नाव आहे.
काँग्रेसचे आमदार राहिलेल्या आणि विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या झिशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. झिशान यांच्या पर्सनल ईमेल आयडीवर काही तासांपूर्वी धमकीचा मेल आला. ज्याप्रकारे तुझ्या बापाची हत्या झाली, त्याचप्रकारे तुझी हत्या होणार, असा उल्लेख मेलमध्ये आहे. या ईमेलमधून झिशान यांच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. Zeeshan Siddiqui
पोलिसांच्या सायबर विभागानेही चौकशी सुरू केली आहे. संबंधित ई-मेलची सखोल तपासणी करून त्याचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. धमकीच्या मेलमध्ये झिशान सिद्दिकी यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारू, असे लिहिण्यात आले आहे. हे प्रकरण अधिक संवेदनशील असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी झिशान सिद्दिकी यांचे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ल्या झाला होता. त्यांच्यावरील गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे झिशान सिद्दिकी यांना मिळालेली धमकी अधिक गंभीर स्वरूपाची मानली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांसह वांद्रे पोलिस करत आहेत.
Former MLA Zeeshan Siddiqui receives death threat
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत