विशेष प्रतिनिधी
मुंबई : Girish Mahajan काँग्रेस पक्षासह सर्वच पक्षातील नेते आमच्याकडे येण्यासाठी नंबर लावून बसले आहेत”, असा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला. आहे.Girish Mahajan
बीडच्या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला होता. “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो”, असं खळबळजनक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यांच्या या विधानासंदर्भात गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे काहीही बोलत असतात. आता राज्यातील विरोधी पक्षाची परिस्थिती कशी झाली आहे? हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीतरी भडक बोलायचं आणि कोणावर तरी काहीतरी आरोप करायचे? असं विरोधकांचं काम झालं आहे. बीडचं प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय गांभीर्याने घेतलं आहे. ज्या-ज्या मागण्या झाल्या त्याबाबत चौकशी झाली आहे. त्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. त्यामुळे विरोधी पक्षाकडून होणारे आरोप निराधार आहेत.
वडेट्टीवार यांनी म्हटलं की, निवडणुकीत ओबीसी नेते म्हणून भुजबळांचा महायुतीने वापर केला गेला. मात्र, त्यानंतर त्यांना न्याय दिला नाही. ते आमच्याकडे येऊ शकतात, असं वडेट्टीवारांनी म्हटलं असल्याचा प्रश्न गिरीश महाजनांना विचारला असता ते म्हणाले, “छगन भुजबळ हे सक्षम आहेत, त्यामुळे ते ठरवतील. आता एवढ्या वाईट परिस्थितीत त्यांच्याकडे (काँग्रेसकडे) कोण जाईल? उलट त्यांच्याकडे जे आहेत तेच आमच्याकडे नंबर लाऊन बसलेले आहेत. काँग्रेस पक्षासह सर्वच पक्षातील मंडळी आमच्याकडे नंबर लावून बसले आहेत. आता आमचं काय? आम्हाला तुमच्याकडे कधी घेता?”, असा मोठा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
Girish Mahajan’s big claim is that the leaders of all the parties, including the Congress, are lining up to come
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : तर मराठे रस्त्यावर उतरणार, मनोज जरांगे यांचा इशारा
- Uddhav Thackeray : चंद्रकांतदादांकडून उध्दव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम, पुण्यातील पाच नगरसेवक करणार ठाकरेंना जय महाराष्ट्र
- Ministry of Defence : संरक्षण मंत्रालयाने 2025 हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून केले घोषित
- Suresh Dhas : माध्यमांमध्ये बोलण्यापूर्वी सरकारशी चर्चा करा, आमदार सुरेश धस यांना बावनकुळेंची तंबी