विशेष प्रतिनिधी
मुंबई Narayan Rane अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असं वाटते असा टाेला भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी लगावला आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यावर त्यांनी हा टाेला मारला आहे.Narayan Rane
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईत एका इफ्तार पार्टीला उपस्थिती लावली होती. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी रमजानचे बंधुत्वाचा संदेश देणारा महिना म्हणून वर्णन केले आणि मुस्लिम समुदायातील लोकांना आश्वासन दिले की, जर कोणी त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस केले तर ते त्याला सोडणार नाहीत. नारायण राणे यांचे पुत्र आणि राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री नितेश राणे हे सध्या मुस्लिम समाजा विरुध्द आक्रमक वक्तव्ये करत आहेत. मुस्लिम समाजाला त्यांनी अनेकदा इशारेही दिले आहेत. अजित पवार यांचा इशारा नितेश राणे यांनाच हाेता अशी चर्चा राजकीय वर्तुळात हाेती. त्यामुळे नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे ते म्हणाले की असे दिसते की अजित पवारांनी डोळे तपासण्याचा एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला कोणी त्रास दिला तर त्याला सोडणार नाही. अजित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही, कोणत्याही जाती किंवा धर्मातील चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला त्रास दिला आणि दोषी आढळला तर त्याला सोडले जाणार नाही.”
Has Ajit Pawar started a new business of checking dates? Question By Narayan Rane
महत्वाच्या बातम्या
- नागपूर हिंसाचाराचे प्लॅनिंग सोशल मीडियावरून, यूट्यूबरसह एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष अटकेत
- Mahavitaran महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
- Ajit Pawar जयंत पाटलांसोबत झाली एआयवर चर्चा, अजित पवारांनी केले स्पष्ट
- Devendra Fadnavis : दुबईला किंवा कुठेही गेला तरी पोलीस कोरटकरला शोधून काढतील, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट