विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्येही ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बॉलीवूडमधील तसेच मराठीतील काही अभिनेते देखील या जुगाराच्या जाहिराती करत आहेत. अभिनेते अशा जाहिराती करूच कसे शकतात?” असा सवाल भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
राज्यामध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन गेमिंग जुगाराबाबत परिणय फुके यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीतील कलाकार लाखो रुपये कमवून असे जाहिराती करत आहेत. या कलाकारांनी केलेल्या जाहिरातीला बळी पडत राज्यातील अनेक लोक ऑनलाईन जुगार खेळत आहेत. या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. लोकांना जुगार खेळायला प्रवृत्त करणाऱ्या अशा ऑनलाइन साधनांवर बंदी घालण्याची गरज आता भासत असून अशा सर्व ॲपच्या चालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्याविरुद्धदेखील प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.
गेमिंग साईट आणि ॲपच्या विरोधात कायदा तयार झाल्यास अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील, असे सांगून आमदार डॉ. परिणय फुके यांनी म्हणाले, ऑनलाइन जुगाराचे अनेक ॲप इंटरनेट आणि गुगल प्ले स्टोअरवर सहज उपलब्ध आहेत. या सर्व प्रकाराला ऑनलाइन गेमिंगचे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात देशात कोणत्याही राज्यात कोणताही कायदा नाही. त्यामुळे, “असे खेळ खेळल्याने व्यसन लागू शकते आणि आर्थिक जोखीम वाढू शकते,” फक्त ही एक ओळ जाहिरात करताना वाचली जाते.
ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. हा पैसा कुठून येतो? कुठे जातो? याची चौकशी होणे गरजेचे आहे. चुकीच्या मार्गाने आलेल्या पैशाचा वापर चुकीच्या कामांसाठी होऊ शकतो. त्यामुळे अशा सर्व ॲपवर बंदी घालण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या संदर्भात सरकारने तातडीने कायदा करावा. तत्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
How can actors advertise gambling? Question from MLA Parinay Phuke
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार