विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chandrashekhar Bawankule उध्दव ठाकरे किती संभ्रमात, एकाकी व खचलेल्या मनस्थितीत आहेत हे कळले असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.Chandrashekhar Bawankule
वक्फ सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी केंद्राने वक्फ विधेयक जमिनींवर डोळा ठेवून आणल्याचा आरोप केला. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर आपली भूमिका मांडली हे बरेच झाले. त्यातून ते आम्हाला किती संभ्रमात, एकाकी व खचलेल्या मनस्थितीत आहेत हे कळलेवक्फ सुधारणा विधेयकावरून भाजपवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था ‘करे तो करे क्या’ सारखी झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी म्हणाले की, अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले.
संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे, असे ते म्हणाले.
How confused, lonely and depressed Chandrashekhar Bawankule’s attack on Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
-
Electricity Consumers : नवीन वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती, वीज ग्राहकांना शाॅक
-
Sanjay Raut : संजय राऊतांची राज्यसभेत नाैटंकी, चुटकी वाजवत म्हणाले काेण म्हणताेय बाळासाहेब ठाकरे
-
Chandrakant Patil: मंत्री चंद्रकांतदादा पाटील सूस घनकचरा प्रकल्पावरून संतप्त, आंदोलनाचा इशारा
-
Raj Thackeray : पुण्यातही मनसेचे मराठी वापरासाठी आंदाेलन, आयसीआयसीआय बॅंकेवर धडकले कार्यकर्ते