Pratap Patil Chikhlikar : वडील राष्ट्रवादीत तर मुलगी भाजपात विकास कसा होणार ? भाजप नेत्याचा चिखलीकर पिता – पुत्रीला सवाल

Pratap Patil Chikhlikar : वडील राष्ट्रवादीत तर मुलगी भाजपात विकास कसा होणार ? भाजप नेत्याचा चिखलीकर पिता – पुत्रीला सवाल

विशेष प्रतिनिधी

नांदेड : वडील राष्ट्रवादीत तर मुलगी भाजपात विकास कसा होणार ? असा सवाल ठाकरे गटातून नुकतेच भाजपमध्ये आलेले एकनाथ पवार यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना केला आहे. तरजे भाजपात नव्याने आलेत, त्यांना पक्ष समजायला वेळ लागेल, मला देवेंद्र फडणीस यांनी स्वतः भाजपात थांबण्यास सांगितल्याचे प्रणिता देवरे – चिखलीकर यांनी स्पष्ट केले आहे. Pratap Patil Chikhlikar

भाजपातून लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आणि ते लोहा – कंधार मतदारसंघातून निवडून येऊन आमदार झाले. मात्र त्यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर या भाजपामध्ये राहिल्या. प्रताप पाटील- चिखलीकर यांनी ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या एकनाथ पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर एकनाथ पवार यांनी ठाकरे शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला आहे. एकनाथ पवार एका कार्यक्रमात म्हणाले की, वडील राष्ट्रवादीत आणि मुलगी भाजपा विकास कसा होणार अशी टीका केली होती. या टीकेचा राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी समाचार घेतला आहे.

कोण काय बोलतो याला मी फारशी किंमत देत नाही. त्यांनी भाजपात काम करावं की राष्ट्रवादी हा त्यांचा विषय आहे. प्रणिता जरूर माझी मुलगी आहे, माझी बहीण आशा शिंदे यांनी शेकापमधून लोहा विधानसभा लढवली होती सुद्धा माझ्या विरोधात होती.भाजपाचं असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन भाजपात थोडं फार असेल तर त्यांनी पक्षातून काढायचं काम करावं. कोणी कुत्र विचारत नाहीत, इथं फडफड करण्यापेक्षा ती तक्रार फडणवीस साहेबांकडे करावी आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावे वडील एका पक्षात आहेत मुलगी दुसऱ्या पक्षात आहे. प्रणिता देवरे चिखलीकर या देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षात आहेत असे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.

विधानसभेच्या निवडणुका या महायुतीमध्ये झाल्या आणि यामध्ये चिखलीकर साहेबांचा पारंपारिक लोहा कंधार मतदार संघ भाजपाला सुटला. देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारून चिखलीकर साहेबांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते निवडून आले. जे माझ्यावर टीका करतात ते विधानसभेला भाजपाच्या विरोधात उभे राहिलेले, काही लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम केल ते लोक भाजपात आलेत. त्यांना विचारधारा नाही, भाजपात काम कशाप्रकारे चालतं हे त्यांना माहीत नाही म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करतात.

रावसाहेब दानवे यांचे पुत्र भाजपाचे आमदार आहेत तर कन्या शिवसेनेत आहेत. नारायण राणे साहेबांचा एक मुलगा शिवसेनेत आहे. एक भाजपाचा मंत्री आहे. खडसे साहेबांच्या सुनबाई भाजपाच्या मंत्री आहेत आणि खडसे साहेब वेगळ्या पक्षात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मला स्वतः सांगितलं तू भारतीय जनता पार्टी सोडायची नाही मी तुझ्या पाठीशी पाठीशी आहे. मी माझं काम करते भारतीय जनता पक्षाने कायम माझ्यावर विश्वास दाखवला आहे असेही प्रणिता देवरे – चिखलीकर यांनी म्हटले आहे.

How will development happen if the father is in NCP and the daughter is in BJP? BJP leader Pratap Patil Chikhlikar father-daughter question

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023