Dhananjay Munde : “अर्धांगवायू नाही, मला बेल्स पाल्सी”, धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण

Dhananjay Munde : “अर्धांगवायू नाही, मला बेल्स पाल्सी”, धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि सक्रीय राजकारणातून दूर असलेले आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या तब्येतीबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले होते. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी , “धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांचे डोळे वाकडे झाले असून त्यांना नीट बोलताही येत नाही,” असं सांगितल्याने ही चर्चा आणखी गडद झाली.मात्र या सगळ्यावर धनंजय मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

“माझ्या चेहऱ्यावर झालेल्या त्रासामुळे बोलण्यास अडचण होते, पण मला अर्धांगवायू नाही. मला दीड महिन्यांपूर्वी बेल्स पाल्सी झाला होता. याचा परिणाम फक्त चेहऱ्यावर झाला असून सध्या मी उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठीही मुंबईत उपचार झाले होते,” असे मुंडे यांनी सांगितले.

बाबासाहेब पाटील यांच्याशी दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीचा उल्लेख करत त्यांच्या काळजीबद्दल आभार मानले. मात्र, “माझ्या आजाराबाबत चुकीची माहिती प्रसारित होऊ नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

धनंजय मुंडे यांचं नाव मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या निकटवर्तीयांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते विधिमंडळ, सभा वा पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूरच राहिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळीही ते अनुपस्थित होते.

“I don’t have paralysis, I have Bell’s palsy”, Dhananjay Munde explains

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023