विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal राजकारणात काहीही होऊ शकते. मात्र एवढ्या घाईघाईत होईल, असं मला वाटत नाही. पण राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.Chhagan Bhujbal
सिने अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रहितासाठी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याची तयारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दाखवली. आमच्यातले हेवेदावे, किरकोळ वाद बाजूला ठेवून मराठी माणसांसाठी काम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. राज ठाकरे यांच्या इच्छेवर उद्धव ठाकरे यांनीही लगोलग सकारात्मक प्रतिसाद महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची गरज बोलून दाखवली. एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते असलेले छगन भुजबळ म्हणाले, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची माध्यमांमध्ये बातमी आली आहे. दोघांनी एकत्र यावं ही अनेकांची इच्छा आहे. त्यांना एकत्र येण्याची संधी २०१४ साली होती. कारण त्यावेळी सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही, अशा राजकीय घडामोडी मागच्या काळात आपण पाहिल्या आहेत.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
दोघांनी एकत्र यावे ही अनेकांची इच्छा आहे. दोघांनीही योग्य निर्णय घ्यावा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हतबल होऊ शकत नाही. कारण त्यांना घरातूनच बाळकडू मिळालेले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक कधीही येईल आणि त्यादृष्टीने राज ठाकरेंची उपयुक्तता सर्व लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. राज ठाकरेंना देखील वाटत असेल आपण एखाद्या मोठ्या पक्षासोबत राहिलो तर याआधी त्यांना जे अनेक वेळा अपयश आलं ते येणार नाही. ते एकत्र यावेत, अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र दोघांचे एकत्र येणे, त्या दोघांवरच अवलंबून आहे, असेही भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले, शिवसेनेने १९९५ साली सरकार स्थापन केले होते. प्रादेशिक पक्ष देखील अलीकडे बलवान झालेले आहेत. एकनाथ शिंदे नेहमीच राज ठाकरेंकडे जातात. फडणवीस देखील अनेक वेळा राज ठाकरेंकडे गेलेले आहेत. बाहेर आल्यावर ते सांगतात, राजकीय चर्चा झाली नाही फक्त भोजनासाठी एकत्र आलो होतो. पण दोन राजकीय पक्षांचे लोक जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा ते फक्त हवामानावर चर्चा करण्यासाठी भेटतात, यावर माझा विश्वास नाही. आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाही. वेगवेगळ्या पक्षांचे सहकार्य घेतल्याशिवाय सरकार बनत नाही. नाही तर काठावरचे सरकार होते. एखादा महत्त्वाचा विषय मंजूर करायचे असेल तर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हल्ली छोटे पक्ष देखील मदतीला लागतात.
If Raj and Uddhav come together, Thackeray will have great power in Maharashtra, believes Chhagan Bhujbal
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना