विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray “धर्म प्रत्येकाने उंबरठ्याच्या आत जोपासला पाहिजे. पण त्यांनी जर धर्म रस्त्यावर आणला तर, आम्ही बुलडोजर फिरवू, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.Raj Thackeray
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बाेलताना राज ठाकरे म्हणाले, मी मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद करण्याबाबत सांगितलं होतं. त्यावेळी माझं ऐकलं नाही आणी 17 हजार मनसेच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या. आत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे वाजवू देणार नाहीत. पण ते त्यावेळी भोंगे वाजवतच नाही. कारण सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाजणाऱ्या लाऊडस्पीकरचा प्रश्न आहे. या लाऊडस्पीकरमुळे लोकांना त्रास होतो. सण असतील त्यादिवशी समजू शकतो.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे वाजवू देणार नाहीत. पण ते त्यावेळी भोंगे वाजवतच नाही. कारण सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाजणाऱ्या लाऊडस्पीकरचा प्रश्न आहे, सरकार म्हणून या भोंग्यांच्या विरोधात उत्तरप्रदेश या राज्याने पुढाकार घेतला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील सर्व लाऊडस्पीकर बंद केले. आपण महाराष्ट्रात घोषणा केली, त्यांनी उत्तरप्रदेशात लाऊडस्पीकर बंद केले. पण महाराष्ट्रात अजून लाऊडस्पीकर सुरूच आहेत”, असेही राज ठाकरे म्हणाले.
“माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधलेली मदार, उघडकीस आणल्यावर तातडीने काढली. ही सगळी अनधिकृत बांधकाम यावर कोंबिंग ऑपरेशन केली पाहिजेत. आपण मुळ विषय म्हणजे शेती, रोजगार, विद्यार्थी, कामगार, शिक्षण हे बाजूला ठेवून दुसऱ्याच गोष्टींमध्ये आपण रमतो आहोत, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
If religion is brought to the streets, bulldozers… Raj Thackeray’s warning
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला