Sushma Andhare : व्हिडीओ जतन केला आहे तर एखादी डॉक्युमेंटरी काढा, सुषमा अंधारे यांची नितेश राणेंवर टीका

Sushma Andhare : व्हिडीओ जतन केला आहे तर एखादी डॉक्युमेंटरी काढा, सुषमा अंधारे यांची नितेश राणेंवर टीका

Sushma Andhare

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sushma Andhare व्हिडीओ जतन केला आहे तर एखादी डॉक्युमेंटरी काढून या फुटेजसह मंत्रिपदासाठी 10 वर्ष काँग्रेसची केलेली जी हुजुरी, आपएसएस आणि भाजपावरची टीका, पुणे पत्रकारांनी विचारलेले प्रश्न सुद्धा ॲड करावेत, अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.Sushma Andhare

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांना महाविकास आघाडीच्या काळात अटक करण्यात आली होती. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाग पाडले होते. या अटकेची आठवून करून देत नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाला इशारा दिला आहे. नारायण राणेंना जेवणावरून उठवून अटक केलेला व्हिडीओ मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्यादिवशी त्याची परतफेड करेन, तेव्हाच तो व्हिडीओ डिलिट करणार, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणेंना टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्वीट करताना म्हटले की, आपण आऊट ऑफ काँटेक्स (विषयांतर) होतोय असं वाटायला लागलं की चटकदार वाक्याने मीडिया स्पेस मिळवण्यात भाचा (नितेश राणे) चतुर आहे. व्हिडीओ जतन केला आहे तर एखादी डॉक्युमेंटरी काढून या फुटेजसह मंत्रिपदासाठी 10 वर्ष काँग्रेसची केलेली जी हुजुरी, आपएसएस आणि भाजपावरची टीका, पुणे पत्रकारांनी विचारलेले प्रश्न सुद्धा ॲड करावेत.

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नितेश राणे म्हणाले की, काही जणांनी आपल्याला हिणवण्याचा प्रयत्न केला. मी कोणतीही गोष्ट विसरलेलो नाही. प्रत्येक बैठकीला जायचो आणि लक्षात ठेवायचो. नारायण राणेंना जेवणावरून उठवून अटक केलेला व्हिडीओ मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्यादिवशी त्याची परतफेड करेन, तेव्हाच तो व्हिडीओ डिलिट करणार आहे. तो क्षण टप्प्या-टप्प्याने जवळ आला आहे. सगळ्यांना माहितेय, मी कशाबद्दल बोलतोय. कोण कुठे जात नाही, सगळ्यांचा हिशेब इथेच होणार आहे. नारायण राणेंना ज्यांनी-ज्यांनी त्रास दिला, ते कोणीही सुटणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना दिला.

If the video is saved, make a documentary, Sushma Andhare criticizes Nitesh Rane

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023