Jitendra Awhad : वक्फच्या चर्चेत जितेंद्र आव्हाड यांचा मंदिरांच्या साेन्यावर डाेळा!

Jitendra Awhad : वक्फच्या चर्चेत जितेंद्र आव्हाड यांचा मंदिरांच्या साेन्यावर डाेळा!

Jitendra Awhad

विशेष प्रतिनिधी

Mumbai News: संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मंदिरांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वक्फ बोर्डापेक्षा जास्त साेने मंदिरांमध्ये आहे ते सरकार ताब्यात घेणार का? असाही सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.

पत्रकार परिषदेत बाेलताना आव्हाड म्हणाले, आमच्या पक्षाने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध केला आहे कारण सरकारला लोकांच्या धार्मिक गोष्टींमध्ये जाण्याची गरज काय? भारताचं संविधान हे सांगतं की तुमचा राईट टू रिलिजन आहे. कलम १९ मध्ये ही तरतूद आहे. त्यानंतर आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत त्याही हजारो एकर आहेत. आपल्या देवस्थानांची मालमत्ता इतकी आहे की भारताच्या बजेटपेक्षा दुप्पट सोनं आपल्याकडे आहे. भारतात जेवढं सोनं सरकारकडे आहे त्यापेक्षा जास्त सोनं हे दक्षिणेतल्या काही मंदिरांमध्ये आहे. प्रश्न तो नाही, जमिनी आल्या कुठून हा प्रश्न होता. मुस्लिम राजघराणी, श्रीमंत लोक यांनी दान धर्म करुन आपल्या स्वधर्मीयांना भल्यासाठी म्हणजे शैक्षणिक संस्था, कॉलेज, मदरसे यांसाठी या जमिनी दिल्या. मी मंत्री असताना फाईलवर लिहिलं होतं की जमीन वक्फ झाली की ती विकता येत नाही. माझ्याकडे जमीन हस्तांतरित करण्यासाठी आणि विकण्यासाठी आली होती. मी नकार दिला. वक्फ म्हणजे दान केलेली जमीन ती विकता कशी येईल?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सरकारने वक्फच्या जमिनी हस्तक्षेप करणं, समित्यांमध्ये आपला माणूस देणं याची गरजच काय? कायदाच करायचा असेल तर असा केला पाहिजे की या जमिनींकडे कुणीही तिरकस नजरेने बघता कामा नये. या जमिनी त्या समाजालाच वापरता येतील. सामाजिक उपयोगासाठीच वापरता येतील अशा तरतुदी त्यात आणल्या पाहिजेत. पण सरकारी हस्तक्षेप, कलेक्टरला अधिकार या सगळ्याची गरजच काय? सरकारच्या या जमिनी नाहीत. ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांच्या बापाची ती जायदात आहे. ख्रिश्चन समाजाकडे हजारो एकर जमिनी आहेत. मुंबईतही अनेक जमिनी चर्चकडे आहेत. सरकारला या सगळ्यात हस्तक्षेप का करायचा आहे? हा माझा प्रश्न आहे. मुकेश अंबानींचं घर कुठल्या जमिनीवर आहे? दुर्दैवाने वक्फच्या काही लोकांनी दुरुपयोग केला. सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज काय?”

In the discussion of Waqf, Jitendra Awhad eye on gold in temples

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023