विशेष प्रतिनिधी
मुंबई : Karuna Sharma करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरविणारा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे.Karuna Sharma
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यावर आज (05 एप्रिल) सुनावणी झाली, त्यावेळी करुणा शर्मा यांनी त्याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले होते. यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. संध्याकाळपर्यंत या खटल्यात निकाल येईल, असे करुणा शर्मा यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले होते. यानंतर आता न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मागील सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलाने करुणा शर्मा यांना पोटगी मिळू नये, म्हणून दोघांचे अधिकृत लग्न न झाल्याचा दावा केला होता. तर करुण शर्मा यांच्या वकिलाने लग्नाचे पुरावे असल्याचे म्हटले. याप्रकरणी आज सुनावणी झाली. तेव्हा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची मीच पहिली पत्नी असल्याचा पुरावा म्हणून दोन महत्त्वाची कागदपत्रे दिली. त्यात धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र होते. स्वीकृती पत्रात माझ्या घराच्या दबावापोटी मी लग्न करत आहे. पण करुणा मुंडे यांचा मी सांभाळ करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. हे सर्व पुरावे तपासल्यानंतर माझगाव सत्र न्यायालयाने वांद्रे दंडाधिकारी न्यायालया निर्णय कायम ठेवला.
धनंजय मुंडे यांनी मागील सुनावणीवेळी मुलांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली होती. तर करुणा शर्मा यांना पत्नी मानण्यास नकार दिला होता. परंतु आता माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांना दर महिना दोन लाख रुपये पोटगी मिळणार आहे.
Karuna Sharma is wife, court orders to pay alimony, shock to Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
-
मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
-
Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख
-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय, इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम न घेण्याचा ठराव
-
Rahul Gandhi : आता काेणी केली बाेलती बंद, वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींचे मौनव्रत