विशेष प्रतिनिधी
Mumbai News: लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे. धर्म विचारून मारले. हिंदू असे कधीही करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले आहे.
मुंबई येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता. वेगळेपणाला धरुन जेव्हा जातो त्यावेळी समाजातील अंतर वाढते. एकतेच्या सूत्राला धरुन चालले की आपलेपणा वाढतो, असेही त्यांनी म्हटले आहे. लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे. काल धर्म विचारून मारले. हिंदू असे कधीही करणार नाही.
सरसंघचालक म्हणाले, आपल्या मनात दुख आहे. आमच्या मनात क्रोध आहे. असुरांचे निर्दालन व्हायचे असेल तर अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे. रावण त्याचे मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचे वध केला.आता क्रोधही आहे आणि अपेक्षाही आहे. यावेळी अपेक्षा पूर्ण होईल असेही वाटते. समाज एक असेल तर कुणी डोळं वाकडं करुन पाहणार नाही. वाकडे कुणी पाहीलं तर डोळा फुटेल. त्याला दमदार उत्तर देऊ अशी अशी अपेक्षा. द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. तसा मार खाणे हाही आपला स्वभाव नाही. शक्तिवान माणसाने अहिंसक असले पाहिजे. शक्तिहिनाला त्याची गरज नाही. शक्ती आहे ती अशा वेळी दिसली पाहिजे.
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरना खोऱ्यात दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली. धर्म विचारून, सुंता केली आहे का पाहून आणि अजान म्हणायला सांगून हिंदुना टिपून मारण्यात आले.
Killed by asking for religion. Hindus will never do this, RSS Chief Mohan Bhagwat comment on Pahalgam terrorist attack
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला