विशेष प्रतिनिधी
मुंबई : मोदीद्वेष आणि भाजपविरोधाने पछाडलेल्या अभिनेता किरण माने याने फेसबुकवर पोस्ट लिहीत अभिनेत्री प्राजक्ता माळी विरोधात भूमिका घेत प्राजक्ताची बाजू घेणाऱ्या मराठी कलाकारांवर टीका केली आहे.
प्राजक्ताबाबतचे विधान निंदनीयच आहे,त्याचा निषेध असे मानभावीपणे म्हणत किरण माने यांनी या विषयाला दुसराच फाटा फोडला आहे. तयांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते, कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या, मणिपूरला भगिनींची विटंबना झाली, तेव्हा जे महाभाग मुग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक-भयानक ‘समस्त महिलावर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी #सुमारांचा_थयथयाट असा हॅशटॅगसुद्धा दिला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी धस यांनी अन्न व नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचा निकडचा सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर गेल्या काही दिवसांत सातत्याने आरोप केले. त्यात त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचाही उल्लेख केला.
राजकीय वादात आपल्याला ओढून चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न धस यांनी केला असून त्यांनी माफी मागावी, अशी प्राजक्ताने मागणी केली. यासंदर्भात तिने पत्रकार परिषद घेतली होती. प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी तिला जाहीर पाठिंबा दिला. कुशल बद्रिके, सचिन गोस्वामी यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. आता अभिनेते किरण माने यांनी याप्रकरणी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
किरण माने यांनी 2022 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधले होते.
Kiran Mane criticism of the actors, saying that the sudden-horrible is ‘about all women’
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : काँग्रेसचा रडीचा डाव, निवडणूक आयोगाने केली बोलती बंद
- संतोष देशमुख हत्येमागील मास्टरमाईंडवर कारवाई व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी
- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसाठी 3 कोटींच्या वाहनांची खरेदी; माजी महापौरांनी थाटबाटावरून केली टीका
- विनोद कांबळी यांना ३० लाख रुपयांची मदत, प्रताप सरनाईक यांची माहिती