Kripashankar Singh : सकाळी उठल्यावर भांग घेतात, त्यामुळे काय बोलतात लक्षात राहत नाही, कृपाशंकर सिंह यांची राज ठाकरेंवर टीका

Kripashankar Singh : सकाळी उठल्यावर भांग घेतात, त्यामुळे काय बोलतात लक्षात राहत नाही, कृपाशंकर सिंह यांची राज ठाकरेंवर टीका

Kripashankar Singh

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Kripashankar Singh राज ठाकरे काय बोलतात त्यांच्या लक्षात राहत नाहीत. मनसैनिकांना काहीतरी करायला सांगतात, पण ते वेगळं काय करतात. मला वाटतं ते सकाळी उठल्यावर भांग घेतात’, अशी टीका भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरेंवर केली आहे.Kripashankar Singh

राज ठाकरेंनी गंगा नदीच्या प्रदूषणावरून टीका केल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंना काही गोष्टी समजायला वेळ लागतो. आज आपण काय बोलत आहोत, उद्या काय बोलणार आहोत? हे त्यांना कधीच कळत नाही. मला वाटतं राज ठाकरे सकाळी-सकाळी उठून भांग वगैरे असं काही तरी घेतात, आणि भांग पिऊन मस्त राहातात. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही, होळीच्या निमित्तानं मला वाटतं त्यांना पण एक भांगेचा गोळा पाठवण्याचा प्रयत्न करतो.

कृपाशंकर सिंग यांच्या या टीकेवर मनसेकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी कृपाशंकर सिंग यांना इशारा दिला आहे. आज सगळीकडे सगळेजण मजा करत आहेत, रंगाची उधळण होत आहे. तर त्यांना मजा करू द्याना आणि स्वत:ही मजा करा. कशाला गलिच्छ राजकारण करता. तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेंबावर टीका करायची आणि जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल. महाराष्ट्र सैनिक गप्प नाही बसणार, कृपा शंकर सिंग यांना इशारा देण्याइतपत ते काही मोठे नाही, राज ठाकरे साहेब म्हणतात तसं ते एक फेरीवाले आहेत. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात, असा घणाघात खोपकर यांनी यावेळी केला आहे.

Kripashankar Singh criticizes Raj Thackeray for smoking cannabis when he wakes up in the morning, so he doesn’t remember what he says

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023