विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kunal Kamra सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता स्टॅंडअप काॅमेडियन कुणाल कामराला दहशतवाद्यांकडून निधी मिळत असल्याचा आराेप शिवसेना (शिंदे गट) युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी केला आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार म्हणत अप्रत्यक्ष विडंबन गीत सादर केले हाेते. हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने स्टुडिओची ताेडफाेड केली हाेती.Kunal Kamra
राहुल कनाल यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री, माननीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बोला, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणे हे सर्वांनाच पचत नाही.. म्हणून कुणाल कोमरासारख्या कठपुतळ्यांना घेऊन दहशतवाद्यांकडून निधी घेऊन त्यांना पाठिंबा देऊन आपल्या देशाची आणि राज्याची अखंडता व कायदा सुव्यवस्थेला हानी पोहोचवली जात आहे.
राहुल कनाल म्हणाले की ते कुणाल कामराचे यूट्यूब चॅनल बंद करण्याची आणि डिमॉनिटाइज करण्याची विनंती युट्यूबला करणार आहेत. खार पोलीस स्टेशनमध्ये पुरावे शेअर करणार आहे. राहुल कनाल उद्या सकाळी खार पोलीस ठाण्यात ११ वाजता पुरावे सादर करण्याकरता जाणार आहेत. युट्यूब ऑफिसलाही भेट देणार आहेत. तिथे ते कुणाल कामराचं चॅनेल बंद करण्याची विनंती करणार आहेत. तसंच, त्याच्या बँक खात्याचीही चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये राहुल कनाल यांनी लिहिलं आहे की, “उद्या १२ वाजता खार पोलीस ठाण्यात भेटुया. मुंबई पोलिसांना विनंती करूया. ही माहिती तपासून कारवाई करण्याची मागणी करूया. युट्यूबलाही पत्र लिहिणार आहे. त्यांनीही कारवाई करावी.”
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी कामराला मुंबई पोलिसांनी मंगळवारी पहिली नोटीस पाठवली होती. त्यानुसार त्याला मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यावर कामराच्या वकीलांनी खार पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीला हजर राहण्यासाठी एक आठवडा वेळ देण्याची मागणी केली होती. ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली असून कामराला दुसरा समन्स जारी केला आहे. त्यानुसार त्याला लवकरात लवकर खार पोलीस ठाण्यात चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. हा समन्स कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आला आहे. त्याच्या वडिलांनी ती स्वीकारल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण कामरा सध्या मुंबई नसल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले.
Kunal Kamra was funded by terrorists to promote content against the government, alleges Rahul Kanal
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची