Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला

Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी अटकेत असलेले पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच हल्ला चढविला. Prashant Koratkar

कोटकर यांची तीन दिवसांची कोठडी संपल्यामुळे कोर्टात आणण्यात आले. यावेळी आणखी दोन दिवसांची (30 मार्च पर्यंत) कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान कोर्ट रुममधून बाहेर पडल्यानंतर वकिलांच्या एका गटाने कोरटकर यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत हल्लेखोरांना बाजूला केले.

नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केलं. त्याच्या त्यांच्यावर कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 18 फेब्रुवारी रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर फरार झाला. तब्बल एक महिना तो पसार होता. त्यानंतर तेलंगणातून कोल्हापूर पोलिसांनी त्याला 24 मार्चला अटक केली.

महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक बोलणाऱ्याला कोल्हापुरी चपलेचा प्रसाद देण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी पहिल्या दिवसापासून काळजी घेतली होती. मात्र आज चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सत्र एस. एस. तट यांच्यासमोर सुनावणी झाली. कोर्ट रुममधून बाहेर पडल्यावर वकिलांच्या एका गटानेच त्याच्यावर हल्ला केला. शिवाजी महाराजांचा अपमान करतोस, असे म्हणत हातकणंगले येथील वकील अमितकुमार भोसले यांनी त्याच्यावर हल्ला केला. ए हरामखोर परशा… छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तू आक्षेपार्ह बोलतोस.. असे म्हणत हल्ला झाला. या हल्ल्यामुळे पोलिस यंत्रणा हडबडून गेली. त्यांनी वकील भोसलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे वातावरणात काही काळ तणावाची स्थिती होती.

Lawyer attacks Prashant Koratkar in court

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023