विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापल्याने धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा कसा झाला याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं ते व्हायरल फोटो पाहून आम्हालाही वेदना झाल्या. त्यानंतर आम्ही सगळे बसलो. त्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असे अजित पवार यांनी सांगितले.Ajit Pawar
एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात अजित पवार यांची मुलाखत झाली. यावेळी ते म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपण सरकार म्हणून एसआयटी नेमली आहे, त्याचप्रमाणे सीआयडी नेमली आहे. या सगळ्या चौकशीत धनंजय मुंडे यांचं नाव कुठेही आलेलं नाही. या प्रकरणात आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही, कोणतंही चुकीचं कृत्य खपवून घेणार नाही.
माझं काम स्ट्रेट फॉरवर्ड असते. बीड असो किंवा पुणे असो चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करणार होणारच. कायद्याचे पालन सगळ्यांनी करावं अशी माझी भूमिका असल्याचे अजित पवार यांनी सांगितले .
छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत अजित पवार म्हणाले, छगन भुजबळ यांनी अनेक ठिकाणी काम केलं. विधानसभा, विधानपरिषदेवर काम केलं आहे. त्यांनी राज्यसभेवर जावे असे मला वाटत होतं. छगन भुजबळांना नाराज करण्याचा माझा किंवा पक्षाचा हेतू नव्हता
देवेंद्र फडणवीस जवळचे आहेत की एकनाथ शिंदे या प्रश्नावर पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तेच जवळचे. मी सध्या कुणालाच नाराज करणार नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पद्धतीने तर मी माझ्या पद्धतीने चांगले संबंध ठेवले आहेत.
सर्वात उत्तम मुख्यमंत्री मात्र आपल्याला विलासराव देशमुख वाटतात. त्यांनी उत्तम कारभार केला असेही पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
Munde resigns after pained by seeing viral photos of Santosh Deshmukh’s murder, Ajit Pawar’s revelation
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार