विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांचे नाव खोडसाळपणे घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबाचा गैरअर्थ काढण्यात आल्याचेही स्पष्ट झाले.
12 ऑक्टोबर रोजी कलानगर परिसरातील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना जबाब दिला होता. मात्र हा जबाब चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात आला.
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्यादिवशी मोहित कंबोज यांच्याशी त्यांचे व्हॉटसअॅपवरवरुन बोलणे झाले होते. या संभाषणानंतर बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या डायरीत मोहित कंबोज यांचे नाव लिहले होते. यानंतर काहीवेळाने कार्यालयाबाहेर पडताच लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मात्र मोहित कंबोज यांचे नाव चुकीच्या पद्धतीने देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आता मोहित कंबोज यांनी एक निवेदन जारी करुन आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एक बातमी आली आहे. झिशान सिद्दीकी यांचे वक्तव्य तोडून मोडून वापरले जात आहे.
मी हे देखील स्पष्ट करतो की चार्जशीट मध्ये माझे कोठेही नाव नाही.
झिशान सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्यादिवशी माझे त्यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले. बाबा सिद्दीकी हे माझे चांगले मित्र होते. आम्ही गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. ते एनडीए आघाडीचा भाग होते. आम्ही दोघे नेहमी एकमेकांशी बोलायचो. यामध्ये अनेकदा निवडणुकीचा विषयही असायचा.
बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी मी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. दुर्दैवाने आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यासारखा मित्र गमावला. याप्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि योग्य तो न्याय होईल.
Name of BJP leader Mohit Kamboj mischievously in Baba Siddiqui murder case
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक