विशेष प्रतिनिधी
मुंबई: Nitesh Rane भाजप मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना दावा केला आहे की, मातोश्रीवर दंगली घडवण्याच्या संदर्भात बैठका झाल्या होत्या. या बैठकींसाठी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांना बोलावण्यात आले होते.Nitesh Rane
“उद्धव ठाकरे दंगलींचे नियोजन मातोश्रीवर बसून करत होते. माझ्याकडे काही तारखांनुसार पुरावे आहेत. उद्धव ठाकरे यांना आम्ही जितके ओळखतो, तितके संजय राऊत त्यांना ओळखत नाहीत,” असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
वक्फ बोर्डावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, “वक्फ कायदा कुठल्याही इस्लामिक राष्ट्रात नाही. ना पाकिस्तानमध्ये आहे, ना बांगलादेशमध्ये. तो केवळ भारतातच आहे. मोदी सरकारने नव्या वक्फ विधेयकात मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाच्या बळकावलेल्या जमिनी परत मिळवून देण्याची तरतूद केली आहे. यापुढे, जर वक्फ बोर्डाने कोणाचीही जमीन बळकावली, तर संबंधित व्यक्तीला थेट उच्च न्यायालयात जाण्याचा हक्क असेल. तसेच, आता वक्फ समितीत हिंदू सदस्यांचा समावेश करण्यात येणार आहे, त्यामुळे हिंदूंच्या जमिनी हडपण्याचा प्रकार थांबेल.”
दिशा सालियान प्रकरणावर भाष्य करताना राणे म्हणाले, “दिशाच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता संबंधित प्रकरण कोर्टासमोर मांडले जाईल आणि न्यायालय योग्य तो निर्णय देईल. दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत यांना न्याय मिळावा, अशी आमची इच्छा आहे.किशोरी पेडणेकर या तीन तास दिशा सालियानच्या आई-वडिलांकडे जाऊन काय करत होत्या? त्यांनी किती दबाव टाकला, किती धमक्या दिल्या? दिशाच्या आई-वडिलांनीच सांगितले आहे की, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला आणि ब्रेनवॉश करण्यात आले. हे आरोप आम्ही केलेले नाहीत, तर दिशाच्या कुटुंबानेच केले आहेत.
संजय राऊतांवरही निशाणा साधत राणे म्हणाले, “जो स्वतः मानसिक असंतुलित असतो, त्याला सगळेच वेडे वाटतात. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलात, तर तिथे सगळेच वेडे दिसतात, तसे उद्धव ठाकरे हेच मनोरुग्ण आहेत. त्यामुळे संजय राऊतांची चूक नाही. ते स्वतःच मनोरुग्ण आहेत.
Uddhav Thackeray planned the riots sitting on Matoshree, Nitesh Rane makes a serious allegation
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार