विशेष प्रतिनिधी
मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन्हीही चांगले आहेत, पण माझ्या मते देवेंद्रजींनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे आणि ते अजूनही उत्कृष्ट काम करत आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? यावर नितीन गडकरी बोलत होते बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण , उद्धव ठाकरे, राज ठाकरे, की एकनाथ शिंदे? तेव्हा थेट उत्तर देण्याऐवजी गडकरी म्हणाले, बाळासाहेबांचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि माझे तिघांशीही चांगले संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तराधिकारी कोण, हा निर्णय शेवटी जनता घेईल. तिघेही माझे मित्र आहेत. राजकारण एक बाजूला आणि माझे व्यक्तिगत संबंध दुसऱ्या बाजूला आहेत.
टोलबाबत त्यांच्यावरील व्हायरल झालेल्या मीमवर गडकरी म्हणाले की, मी टोलचा संस्थापक आहे. मी महाराष्ट्रात मंत्री असताना, मी मुंबई पुणे महामार्ग, ५५ उड्डाणपूल आणि वांद्रे वरळी सीलिंग प्रकल्प बांधला होता आणि बाजारातून पैसे उभे केले होते. दोन दिवसांपूर्वी मी संसदेत सांगितले होते की मी दोन वर्षांत २५,००० किलोमीटरचे दोन-लेन आणि चार-लेन रस्ते बांधेन. त्याचे बजेट १० लाख कोटी रुपये असेल.
भारतातील पायाभूत सुविधा अमेरिकेपेक्षा चांगल्या असतील. आम्ही म्हणत होतो की २०२४ पर्यंत आमची रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीची होईल, पण आज मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की पुढील दोन वर्षांत भारतातील पायाभूत सुविधा अमेरिकेपेक्षा चांगली होईल, असही गडकरींनी यावेळी स्पष्ट केलं
Nitin Gadkari said, Shinde – Fadnavis both are good, but Devendra Fadnavis’ performance is very impressive…
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला