Bachchu Kadu : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे धडे; संघटनांनी पुढाकार घ्यावा, १५ ऑगस्टनंतर मुदतवाढ नाहीमहायुतीत मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा नाही, बच्चू कडूंच्या वक्तव्याला बावनकुळे यांचा अप्रत्यक्ष इशारा

विशेष प्रतिनिधी

अमरावती : Bachchu Kadu  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळावे, अशी इच्छा व्यक्त करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.मुख्यमंत्रीपदाबाबतच्या अशा चर्चांना कोणतेही महत्त्व नसून महायुतीच्या समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयांचे सर्वांनी पालन केले पाहिजे, असा स्पष्ट इशारा बावनकुळे यांनी दिल.Bachchu Kadu

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महायुती सरकार अत्यंत मजबूत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वानुमते निवडलेले नेते आहेत. प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक असले तरी सार्वजनिकरीत्या अशी विधाने करण्यापूर्वी संबंधित पक्ष नेतृत्वाशी चर्चा होणे आवश्यक आहे. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये याबाबत स्पष्ट भूमिका ठरलेली आहे.Bachchu Kadu



“समन्वय समितीचे निर्णय कोणी पाळत नसेल, तर त्याबाबत योग्य त्या स्तरावर चर्चा केली जाईल,” असे सांगत बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे.

यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचाही जोरदार बचाव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक जाहीरनाम्यातील महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करून सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना बावनकुळे यांनी महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. “प्रवीण पोटे विक्रमी मतांनी विजयी होतील आणि यावेळी सर्व जुने विक्रम मोडले जातील,” असा दावा त्यांनी केला.

माजी खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय भवितव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, त्या भाजपच्या निष्ठावान नेत्या आहेत आणि पक्षाच्या विचारधारेवर त्यांची ठाम श्रद्धा आहे. एका निवडणुकीतील पराभवामुळे राजकीय कारकीर्द संपत नाही. पक्ष नेतृत्व योग्य वेळी त्यांच्या भूमिकेबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत चर्चांना उधाण आले असले तरी भाजप नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले आहे.

No Discussion on Chief Minister’s Post in Mahayuti; Bawankule Issues Indirect Warning Over Bachchu Kadu’s Remarks

महत्वाच्या बातम्या