विशेष प्रतिनिधी
मुंबई : औरंगजेब हा आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी आराध्य देव झाला आहे. लवकरच बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ औरंगजेबाचा फोटो मातोश्रीवर लागलेला दिसेल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी केले आहे.
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर ते म्हणाले, भाजपाचे बडे नेते लालकृष्ण अडवाणी यांना कोणीही कैद करून ठेवलेले नाही. अडवाणी यांचे वय आता 95 वर्षांपेक्षा अधिक आहे. ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. ते लोकसभेत अखेरपर्यंत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण कॅबिनेट त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला जाते. त्यांना कोणीही कैद केले नाही. लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र शासनातर्फे सर्व प्रकारची सुविधा दिल्या जाते. त्यांच्या भेटीगाठीसाठी त्यांच्या इच्छे प्रमाणे कोणीही जाऊ शकतो. त्यांना भेटू शकतो. संजय राऊत यांनी त्यांच्याविषयी जे म्हटले आहे. ते चुकीचे आहे. त्यांनी हा आरोप मागे घ्यावा. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
यावेळी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना निरुपम म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्या हात दिशा सालियानचा हत्यामध्ये आहे, असे मला वाटते. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दिशा सालियानची वडिलांनी सांगितलेला आहे की त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. कोणी वडील असं खोटे बोलू शकत नाही. सतीश सालियान यांची याचिका दाखल करून न्यायालयाने चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुस्लिम समाजाच्या इफ्तार पार्टीत जे म्हटले आहे ते आम्हाला दुरुस्त करायचे आहे. देशभक्त आणि भारतीय असलेल्या मुस्लिमांवर आमचे कोणतेही आरोप नाहीत. पण दंगल घडवणारा कोणताही मुस्लिम देशद्रोही आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि अजितदादाही त्याला वाचवू शकणार नाहीत, असा इशारा निरूपम यांनी दिला.
Now Aurangzeb Aaradhya Dev, Sanjay Nirupam criticize Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- नागपूर हिंसाचाराचे प्लॅनिंग सोशल मीडियावरून, यूट्यूबरसह एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष अटकेत
- Mahavitaran महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
- Ajit Pawar जयंत पाटलांसोबत झाली एआयवर चर्चा, अजित पवारांनी केले स्पष्ट
- Devendra Fadnavis : दुबईला किंवा कुठेही गेला तरी पोलीस कोरटकरला शोधून काढतील, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट