विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prajakta mali अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपली बदनामी होत असल्याची कैफियत पत्रकार परिषद घेऊन मांडली होती. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील एक पोस्ट लिहीत प्राजक्ताचे समर्थन केले आहे. Prajakta mali
आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हीच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेल्यानंतर प्राजक्ताने संताप व्यक्त केला. पत्रकार परिषद घेऊन चिखलफेक करण्याऱ्यांनी माफी मागावी, असे आवाहन केली होते. मात्र धस यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.
Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन
आता एक पोस्ट करून पंकजा मुंडे प्राजक्ताच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत.पंकजा मुंडे यांनी लिहिले आहे, “शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. ‘दुर्दैवी घटना’हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने ,नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक..दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व..काल पाहवलं नाही ,पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all #women
'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत?…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 29, 2024
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच, धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. आपपासांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, अशा शब्दांत भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्राजक्ताने धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या वादंगादरम्यान आमदार सुरेश धस यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींसह माळीचेही नाव घेत टिप्पणी केली होती.
Pankaja Munde came forward in support of Prajakta
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : काँग्रेसचा रडीचा डाव, निवडणूक आयोगाने केली बोलती बंद
- संतोष देशमुख हत्येमागील मास्टरमाईंडवर कारवाई व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी
- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसाठी 3 कोटींच्या वाहनांची खरेदी; माजी महापौरांनी थाटबाटावरून केली टीका
- विनोद कांबळी यांना ३० लाख रुपयांची मदत, प्रताप सरनाईक यांची माहिती