विशेष प्रतिनिधी
जळगाव : मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर ते बाहेर निघाले तरी लोक त्यांना जोड्याने मारतील. मी अजूनही त्यांना आव्हान देतो. त्यांनी फक्त एक पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडतो, असे आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन Girish Mahajan यांनी दिले आहे. Girish Mahajan
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल आहेत. महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला आहे. याचे कॉल रेकॉर्डिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असल्याचेही ते म्हणाले आहेत.
यावर संतप्त प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, त्यांनी पुरावे लोकांना दाखवावेत. त्यांनी नुसतं बडबड करू नये. यांना पुरावे दिले, त्याला पुरावे दिले, असे करू नये. खोटं बोलतानात्यांना लाज वाटत नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की, त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा आता त्यांनी अंत पाहू नये.
मी एका गोष्टीचा खुलासा केला, तर तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे. पण मी ती बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. खडसे यांनी एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला. त्यातूनच हे सगळं समोर आलं आहे.
एकनाथ खडसे यांनी आरोप केला आहे की, महाजन आणि एक महिला आयएएस अधिकारी यांच्यात संबंध आहेत. याची कल्पना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनादेखील आहे. विशेष म्हणजे अमित शाहा आणि माझी कधी भेट झालीच तर मी महाजन यांच्यावरील या आरोपांबाबत विचारणार आहे, असेही खडसे म्हणाले
People will beat Eknath Khadse with slippers, Girish Mahajan’s direct challenge
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख