विशेष प्रतिनिधी
अमरावती : राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे, या राज्यामध्ये विरोधी पक्ष भाजपने ठेवला नाही. ज्या दोघांना सोबत घेतलं त्यांना पण ठेवलं नाही. म्हणजे मित्र पक्ष पण गायब , विरोधी पक्ष पण गायब. आता फक्त भाजप आहे, अशी टीका करत माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपची तुलना रशियाचे पुतीन यांच्याशी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले, भाजप शिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही. रशियात पुतीन ज्या पद्धतीने काम करतात तसे भारतीय जनता पक्ष करत आहे. कुठलाही दुश्मनच इथे ठेवायचा नाही. विरोधक संपवायचे अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेऊन संपविले. नितीश कुमार यांची सुद्धा अशी अवस्था होऊ शकते. घोडा मैदान समोर आहे, असेही कडू म्हणाले.
दिव्यांगासोबत बेईमानी शक्य नाही. दिव्यांगांना न्याय देण्यासाठी आता आंदोलन करावे लागणार असल्याचं सांगत माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान, अध्यक्षपदाचा राजीनामा देत त्यांनी टीका केली होती.
शिवसेनेतील बंडानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यांची राज्य मंत्री असलेले कडू यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र मंत्री पद मिळाले नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे महायुतीतून बाहेर पडून त्यांनी राजू शेट्टी, संभाजीराजे यांच्यासोबत परिवर्तन महाशक्ती उभारली. पण त्यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला.
policy of eliminating allies along with opponents, Bachchu Kadu compared BJP with Putin
महत्वाच्या बातम्या
- या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा बजरंग सोनवणे यांना इशारा!
- भिकारी वाढलेत, शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मोफत जेवणावर सुजय विखेंची टीका
- Devendra Fadnavis : भाजप, कम्युनिस्ट सोडता सर्व 2300 पक्ष खाजगी मालकीचे, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- अडीच वर्ष शिव्या-शाप देणाऱ्यांचे तोंड महाराष्ट्रातील जनतेने बंद केले, एकनाथ शिंदे यांचा टोला