विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Ambedkar परभणी येथील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला काही जण त्रास देत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांशी अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच सूर्यवंशी कुटुंबियांच्या समस्या देखील त्यांनी मांडल्या आहेत. Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आणखी दोन गोष्टी सांगितल्या. नवी मुंबई एका मुलीवर अतिप्रसंग झाला. त्या कुटुंबाला त्यांच्या जागेच्या बदल्यात नवी जागा द्यावी ही विनंती आहे. त्यांचे स्थानांतर करण्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सूर्यवंशी प्रकरणात निर्देश देत आहेत. चौकशी फास्ट ट्रॅकवर घेणार आहेत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. Prakash Ambedkar
आंबेडकर म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांना झालेल्या हाणामारीची चौकशी करावी. कुटुंबियांच्या काही तक्रारी आहेत. चौकशीत दिरंगाई होत असून त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांना झालेल्या हाणामारीची चौकशी करावी. कोठडीत मृत्यू झाला, त्यामुळे मॅजिस्ट्रेटने चौकशी करायची असते. पोलिस त्यात काही करू शकत नाही. आम्ही जी मागणी केली होती ती मान्य झाली आहे, अशी देखील माहिती आंबेडकरांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आणखी दोन गोष्टी सांगितल्या. नवी मुंबई एका मुलीवर अतिप्रसंग झाला. त्या कुटुंबाला त्यांच्या जागेच्या बदल्यात नवी जागा द्यावी ही विनंती आहे. त्यांचे स्थानांतर करण्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सूर्यवंशी प्रकरणात निर्देश देत आहेत. चौकशी फास्ट ट्रॅकवर घेणार आहेत, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी मराठी भाषेवर देखील चर्चा केली असून, ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचा भाषा आणि मातृभाषा म्हणून अभिमान आहे. घरगुती वापर झालाच पाहिजे. देश म्हणून पाहतो, तेव्हा ती राष्ट्रीय भाषेला पर्याय म्हणून पाहू नये. ती घरगुती भाषा म्हणून संबोधले पाहिजे.
आज सह्याद्री बंगल्यावर राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली.
परभणी प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई, भाऊ आणि काही नातेवाईकांनी दि. ५ जानेवारी रोजी अकोला येथे माझी भेट घेतली होती आणि तपासाच्या संदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. तसेच या प्रकरणात…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 8, 2025
Prakash Ambedkar complains to the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Microsoft : मायक्रोसॉफ्ट भारतात करणार ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, हिंजवडी येथील डेटा सेंटरचे विस्तारीकरण
- Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींचे मारेकरी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही करणार होते खून
- Hair loss : पहिल्या दिवशी केसगळती अन् तिसऱ्या दिवशी टक्कल, शेगाव तालुक्यात अज्ञात आजार
- Laxman Hake : मोर्चे आणि राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर..लक्ष्मण हाके यांचा सुरेश धस आणि जरांगे यांना इशारा