विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रयागराज येथील कुंभमेळ्यावर टीका केली. ईव्हीएमवरही संशय घेत मनसेला मतदान करूनही ती मते दिसली नाहीत असा आरोप त्यांनी केला.Raj Thackeray
मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले, काही जण म्हणतात हरलेला पक्ष. निवडणुका संपल्या सर्व गोष्टी झाल्या. पण गेल्या निवडणुकीत मनसेला ज्यांनी मतदान केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्यांनी मनसेला मतदान करूनही ज्यांची मते ईव्हीएममध्ये दिसली नाहीत, त्यांचेही मी आभार मानतो. आता जे झालं ते झालं. आता मला बरंच काही बोलायचं आहे.
बरंच बोलायचं आहे. निवडणुका झाल्यावर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोनही आले. नेमके आजच मला फोन आले. आज का आले याचे अर्थ मला समजतो. जरा जपून, असा सल्ला द्यायचा असेल असा आरोपही राज ठाकरेंनी केला.
ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत काही घटना घडल्या. त्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी म्हटल्यानुसार, बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं. मी त्यांना म्हटलं पिणार नाही.
मग नव्याने वारं शिरलेल्यां हिंदुत्वाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला.
आपल्या देशात नद्यांची भीषण अवस्था आहे, ज्यांना आपण माता म्हणतो, ज्यांना आपन देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं आहे. गंगा साफ झाली पाहिजे असं म्हणणारे पहिले व्यक्ती म्हणजे राजीव गांधी, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं. तेव्हापासून आपण गंगाच साफ करत आहोत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आपल्या गोष्टीत आपण सुधारणा नको करायला. काळ बदलला. लोकसंख्या वाढली. हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आताच्या वेगळ्या आहेत. हेच विधी आटोपण्यासाठी वेगळ्या घाटावर एखादी जागा करता येत नाही का? म्हणतात लोक ऐकत नाही. ऐकत कसे नाहीत. दारू पिऊन गाडी चालवल्यावर पोलीस पकडतात. हे कळल्यावर लोकं टॅक्सीत पिऊन जातात ना. झाली ना सुधारणा. आपल्या नद्या स्वच्छ राहिले पाहिजे. तिथले काही भाग इतके गलिच्छ आहे. आपणच या नद्या बरबाद करतोय. कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली. प्रत्येकाने आपल्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
महाकुंभात ६५ कोटी लोक येऊन गेल्याचा दावाबाबत राज ठाकरे म्हणाले. ६५ कोटी लोक म्हणजे अर्धा भारत. चला तर व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सोडू. बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला. महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थिती हीच आहे. कोकणातील सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात ३११ नदी पट्टे आहे. ते प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर आहे. महाराष्ट्रातील यातील ५५ नदी पट्टे प्रदूषित आहेत. यातील सर्वात प्रदूषित नद्या, सर्वात प्रदूषित उल्हास मिठी, उल्हास, पवना, भीमा,मुळा मुठा पवना गिरणा कुंडलिका, दारणा कान्हा तापी, इंद्रायणी निरा चंद्रभांगा वैनगंगा, वर्धा कृष्णा, या नद्या प्रदूषित आहे. भातसा, पैनगंगा या नद्यांच्या पात्रातील पाणी वाईट आहे. त्या नद्यांच्या तुलना. मुंबईत पाच नद्या होत्या. त्यातील चार नद्या मेल्या. पाचवी मिठी नदी मरायला आली, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
Raj Thackeray again criticizes Kumbh Mela, also raised doubts on EVMs
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला