विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : माझ्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही म्हणत राजन साळवी उध्दव ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्या पक्षप्रवेशाबद्दल विविध चर्चा सुरु आहेत.या अनुषंगाने राजापूर आणि लांजा मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तुमच्यावर अन्याय झाला आहे. तुम्ही योग्य निर्णय घ्या अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन
साळवी म्हणाले, आज जो दुख:चा डोंगर पक्षावर, माझ्या कुटुंबावर आला त्याला कारणीभूत कोण हे शोधणे गरजेचे आहे. भविष्यात माझ्यावर जशी वेळ आली आहे तशी अन्य कोणावर येऊ नये यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने योग्य निर्णय घेतला पाहिजे
एसीबीच्या रडारवर असलेले अन् विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजन साळवी आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. ते लवकरच पक्ष सोडून इतर पक्षात स्थायिक होणार असल्याच्याही चर्चेला जोर आला आहे.
Rajan Salvi prepares to make Thackeray ‘Jai Maharashtra’
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट