विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांनी रविवारी, 19 जानेवारी 2025 रोजी अभिनेता सैफ अली खान यांच्या ठाणे येथील घरात झालेल्या हल्ला आणि चोरीच्या प्रयत्न प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शरीफुल इस्लाम शहजादा (वय 31) असून तो मागील पाच ते सहा महिन्यांपासून मुंबईत राहत होता. तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले आहे. Saif Ali Khan
शहजादाने “विजय दास” या बनावट नावाने भारतात प्रवेश केला होता आणि एका स्थानिक हाऊसकीपिंग एजन्सीत काम करत होता. त्याच्याकडे भारतात कायदेशीर राहण्याचे कोणतेही वैध दस्तऐवज आढळले नाहीत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सैफ अली खान यांच्या बांद्रा येथील “सतगुरु शरण” या निवासस्थानी हा पहिलाच चोरीचा प्रयत्न होता. मात्र, या घटनेत चोरीचा प्रयत्न हल्ल्यात बदलला. या हल्ल्यात सैफ अली खान यांना अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले. त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शरीरातून 2.5 इंच लांबीचा चाकूचा टोक काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. सैफ अली खान यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आयसीयूमधून हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना “धोक्याबाहेर” असल्याचे सांगितले आहे.
पोलिस उप आयुक्त दिक्षित गेडाम यांनी माहिती दिली की, शहजादाला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे आणि पोलिस त्याचा पुढील तपासासाठी पोलिस कोठडी मागतील.
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर आहे. तो बांगलादेशातील झलोकाठी या जिल्ह्यातील राजाबरीया येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तो 30 वर्षांचा आहे. त्याने भारतात घुसखोरी केली आहे. सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि नंतर त्याने थेट मुंबई गाठली.
भारतात आल्यानंतर तो ठाण्यात एका हॉटेलमध्ये हाऊसकिपिगचं काम करत होता. त्यानंतर कन्स्ट्रक्शन साईटवरही काही दिवस काम केल्याचे तपासात समोर आले. पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला होता. हा अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. चोरीच्या उद्देशाने तो सैफच्या घरात शिरला मात्र ते सैफअली खानचं घर होतं हे त्याला माहित नव्हतं.
पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री
सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर शरीफुल इस्लाम शहजाद हा लपत फिरत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. टीव्हीवर त्याचे फोटो दाखवले जात होते. त्यामुळे टीव्ही पाहून आरोपी सतत लोकेशन्स बदल होता, अशी माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यावर तो घाबरला होता. त्याने ज्या घरात चोरी केली ते सैफ अली खानचं घर आहे हे त्याला माहीत नव्हतं. जेव्हा त्याला सैफ अली खानवर आपण हल्ला केला याची माहिती मिळाली त्यावेळी तो अधिकच घाबरला होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
टीव्हीवर त्याचे फोटो झळकल्याने एका मुकादमाने त्याला हटकले होते. त्याला पोलीस शोध आहेत. पोलिसांसमोर शरणागती पत्कर असं या मुकादमाने त्याला सांगितलं होतं. त्यामुळे तो अधिकच मानसिक तणावात आला होता. त्यामुळे त्याने बांगलादेशात परत पळून जाण्याचा प्लान आखला होता. त्यासाठी त्याने अनेकांना संपर्कही साधला होता. जोपर्यंत बांगलादेशात जाण्याचं ठरत नाही, तोपर्यंत लपून राहण्याचा त्याचा प्लॅन होता. पण पोलिसांना त्याची टीप लागली आणि तो बांगलादेशला पळून जाण्याआधीच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या.
Saif Ali Khan attack case is a Bangladeshi citizen
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती