विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पहिल्यांदाच शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष नेमण्यात आले आहेत. संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांच्यावर मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज ठाकरे म्हणाले, मुंबईत आम्ही पक्षसंघटनेत काही पदरचना केलेल्या आहेत. आतापर्यंत पक्षात फक्त विभाग अध्यक्ष हे पद होतं. पण आता शहराध्यक्ष एक आणि उपशहराध्यक्ष तीन नेमण्यात आले आहेत. मनसेच्या केंद्रीय समितीची स्थापना करत मुंबई आणि ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी मनसेत काही नवीन पदांची घोषणा करत ही जबाबदारी काही पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरे यांनी सोपवली आहे. यामध्ये मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या सर्व शाखाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शीव या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. पश्चिमेकडच्या विभागाची जबाबदारी कुणाल माईनकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे, तसेच पूर्वेकडच्या विभागाची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आता या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या चौकटीत काम करायचं? याची सर्व माहिती त्यांना दिली जाईल”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
“केंद्रीय समिती गटाध्यक्षपदाची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच नितीन सरदेसाई यांच्याकडे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक लोक आहेत. अशाच प्रकारची रचना ठाणे शहरात देखील केलेली आहे. ठाण्यात देखील केंद्रीय समिती केली आहे. या समितीत अविनाश जाधव हे एक जबाबदारी पाहतील, अभिजीत पानसे हे एक जबाबदारी पाहतील तसेच राजू पाटील हे एक जबाबदारी पाहतील”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
Sandeep Deshpande, the responsibility of Mumbai city president MNS
महत्वाच्या बातम्या
- नागपूर हिंसाचाराचे प्लॅनिंग सोशल मीडियावरून, यूट्यूबरसह एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष अटकेत
- Mahavitaran महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
- Ajit Pawar जयंत पाटलांसोबत झाली एआयवर चर्चा, अजित पवारांनी केले स्पष्ट
- Devendra Fadnavis : दुबईला किंवा कुठेही गेला तरी पोलीस कोरटकरला शोधून काढतील, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट