विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे केला आहे.
संजय राऊत यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीकास्त्र डागले. राऊत म्हणाले की, कालपर्यंत संघाला शिव्या घालत होते, वीर सावकरांना शिव्या घालत होते, संघाला हाफ चड्डीवाले बोलत होते, फडणवीस, मोदींना शिव्या घालत होते. ते आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. पण आम्ही बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या हे विषय घेऊन राजकारणात आहोत. आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतोय. लोकांच्या पोटात अन्न नाही आणि तुम्ही हिंदुत्ववाद करत बसला आहात. Sanjay Raut
काही लोकं छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत, राखरांगाोळी करायला निघाले आहेत. हे राज्य नष्ट व्हावे अशी सुपारी देऊन यांना भाजपामध्ये पाठवले आहे का? देवेंद्र फडणवीस जर संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर हे सहन कसे करत आहेत? मोहन भागवतांना जर देशाची खरोखर चिंता असेल तर हे सहन कसे करत आहेत. हलाल आणि झटक्यांमुळे हिंदुत्वाला झटका बसणार आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
विकसीत कृषीप्रधान महाराष्ट्रात तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी आपली भूमिका मांडली आहे का? ज्यांना या देशावर राज्य करायचे आहे अशा संघाच्या सरसंघचालकांना कधी बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्यांवर कधी बोलले आहेत का? मोहन भागवत सतत वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात. हिंदू मुसलमानांमध्ये वाद नाही, हिंदू मुसलमानांनी एकत्र काम करायला हवे. आमचा डिएनए एक आहे. हे जर मोहन भागवत सतत बोलत असतील तर त्याची अंमलबजावणी करणार कोण? भाजपा त्यांचाच पक्ष आहे ना. तुमचा पक्ष सत्तेत आहे. कितीही तुम्ही नाकारलात तरी तो तुमचाच पक्ष आहे. तुमच्या नियंत्रणात आहे. ज्या प्रकारचे लोक तुमच्या पक्षात आले आहेत त्यांच्यावर नियंत्रण कोण ठेवणार, त्यांच्या तोंडाला टाके कोण मारणार? असा सवाल त्यांनी केला.
Sanjay Raut accuses Rane of setting Shivaji Maharaj’s Maharashtra on fire
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!