विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्यांना इतिहासाचे भान नाही, इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक असे उद्योग करत आहेत. औरंगजेबाची कबर काढायचीच असेल तर शासनाने कबर हटवावी. कशासाठी हे लोक नाटकं करत आहेत. लोकांना त्रास देत आहेत, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर हटवण्यसाठी आजपासून आंदोलन सुरु केले आहे, त्यावर संजय राऊत म्हणाले की, ज्यांना इतिहासाचे भान नाही, इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक हे असे उद्योग करत आहे. केंद्रात आणि राज्यात यांच्याच विचारांचे सरकार आहे. मग सरकारने तसा शासनादेश काढला पाहिजे. उलट राज्याचे पोलीस आणि केंद्र सरकारचे संरक्षण का दिले जात आहे?
राऊत म्हणाले की, आज शिवजयंती आहे. महाराष्ट्रातील सरकार हे त्यांचे नाव घेऊ चालले आहे. मात्र त्यांच्या विचाराने चालले आहे का, असा सवाल राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सरकारने घ्यावा. शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य केले आहे.
महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्याच पक्षाचे राज्य आहे. मोदी आणि फडणवीस हे याच विचारांच्या लोकांचे आहे. मग त्यांना कबर हटवण्यासाठी कोणी अडवले आहे. कशासाठी अशी नाटकं करता, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला, त्याचे थडगे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मारक आहे. आमच्या येणाऱ्या पिढ्यांना कळण्यासाठी यांचे थडगे असलेच पाहिजे.